महिलेवर खुनी हल्ला केल्याप्रकरणी आरोपीला जामीन मंजूर

Edited by:
Published on: August 06, 2023 15:03 PM
views 326  views

सावंतवाडी : महिलेचा विनयभंग करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न करण्याचा प्रकार दि. 22/05/2023 रोजी कोनशी, ता. सावंतवाडी येथे घडला होता. व याकामी आरोपी बाबलो शंकर वरक याला भा.द.वि. कलम 307 व 354 अन्वये अटक करण्यात आलेली होती. आरोपी तर्फ़े ॲड. अनिल निरवडेकर जामीन अर्ज ओरोस येथील प्रधान जिल्हा न्यायाधीश साहेब यांचे कोर्टात दाखल केलेला होता.  फिर्यादीने दिलेल्या तक्रारी नुसार आरोपी बाबलो शंकर वरक रा. कोनशी, टेंबवाडी याने संबंधित फिर्यादी हि पाण्याचा पंप चालु करण्याकरीता गेली असता आरोपी याने तिच्या हाताला पकडुन तिला जवळ ओढुन तिच्यावर विनयभंग केला होता. फिर्यादी हिने ओरडण्याचा प्रयत्न केला असता आरोपी याने तिला जमिनीवर पाडून तिच्या मानेवर पाय ठेवून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला होता तसेच त्यावेळी तिचा गळा दाबल्यामूळे श्वास गुदमरला व ती जमीनीवर पडून राहीली त्यानंतर ती काही वेळाने धडपडत उठली पण तिला गळा दाबल्यामूळे व श्वास कोंडल्यामूळे उठता येत नव्हते त्याचवेळी काही वेळाने तिचे वडील आले व तिला घरी घेऊन आले. 

त्यानुसार बांदा पोलिस ठाणे येथे आरोपी याच्या विरुद्ध भा.द.वि. कलम 307 व 354 अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी याला दि. 23/05/2023 रोजी अटक करण्यात आलेली होती. याकामी आरोपी याच्या तर्फे ॲड. अनिल निरवडेकर यांनी जामिन अर्ज दाखल केलेला होता, त्यानुसार ओरोस येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब श्री. एस. जे. भारुखा यांनी  ॲड.निरवडेकर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन आरोपी याची जाचक अटी घालून रक्कम रु. 15000/- जामिनावर मोकळीक करण्याचा आदेश केलेला आहे. त्यात आरोपी याने केस चालू होईपर्यंत जिल्ह्यात येण्यास बंदी घातलेली आहे.  याकामी आरोपी तर्फे ॲड. अनिल निरवडेकर व ॲड. गणेश चव्हाण यांनी काम पाहिले.