
सावंतवाडी : सावंतवाडी कारागृहातील बांग्लादेशी आरोपीला सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता पोलीसांची नजर चुकवून तो फरार झाला. त्यामुळे सावंतवाडी तालुक्यात ठिकठिकाणी सिंधुदुर्ग पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे. आरोपीला सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता त्याने पोलिसांची नजर चुकवत धूम ठोकली.