एनडीएचं खातेवाटप ; कोणाला कोणतं खातं ?

महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश
Edited by: ब्युरो
Published on: June 10, 2024 14:42 PM
views 481  views

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 72 जणांनी रविवारी 9 जूनला कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. महाराष्ट्रातील 6 जणांचा यामध्ये समावेश होता. शपथ घेतल्यानंतर या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. अखेर आज हे खातेवाटप जाहीर करण्यात आलं. 

त्यानुसार नितीन गडकरी यांना पुन्हा त्यांचं रस्ते आणि परिवहन वाहतूक मंत्रालय, अमित शाह यांना गृह, एस जयशंकर यांना परराष्ट्र, राजनाथ सिंह यांना संरक्षण आणि अश्विनी वैष्णव यांना रेल्वे मंत्रालय मिळालं आहे.

कोणाला कोणतं खातं ?