
कणकवली : कणकवली तालुका सह सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेली आठ ते दहा दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये डोळे येण्याचे रुग्ण आढळून येत आहेत. २७ जुलैपासून जिल्ह्यात डोळे येणे या आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचार घेतलेले आणि सर्व्हेमधून आढळून - आलेले असे एकूण १८१ रुग्ण आहेत. यापैकी ३४ रुग्ण बरे झाले आहेत, उर्वरित उपचार घेत आहेत. डोळे येणे हा संसर्गजन्य आजार आहे.डोळे आलेल्या रुग्णांनी बाहेर पडताना गॉगल किंवा चष्म्याचा वापर केल्यास इतर जणांना त्याचा संसर्ग होणार नाही. योग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे.