
कणकवली : मुंबई गोवा महामार्गावर वागदे येथे पुणे स्वारगेट कराड मार्गे राजापूर ते गोवा जात असताना दुचाकीला अपघात होऊन अभिषेक संजय देसाई(वय -२२,रा.पुणे) युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे.हा अपघात सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की एका दुचाकी कंपनीकडून रायडर्स ना टूर आयोजित करण्यात आली होती. ३० जणांचा ग्रुप करून स्वारगेट ते गोवा असा दुचाकी वरून सर्वांचा प्रवास सुरू होता. या तीस मित्रांनी राजापूर येथे जेवण केलं होतं,अचानक वागदे येथे आल्यानंतर त्या युवकाचा अपघात होऊन जागीच मृत्यू झाल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले. याबाबत कणकवली पोलीस अधिक तपास करीत आहेत.