
रत्नागिरी : कोल्हापूर महामार्गाचे काम सुरू असल्याने रत्नागिरीतील या रस्त्यावर अनेक ठिकाणी पर्यायी ( डायव्हर्शन) ठेवण्यात आली आहेत. आज सकाळीच ७.१५ वाजण्याच्या च्या दरम्यान, या मार्गावर सावंत पॅलेस हॉटेल समोर असलेल्या डायव्हर्शनवर एक दुचाकी घसरली. आणि दुचाकीवरील दोन स्वार खाली पडले. खाली पडलेल्या या दुचाकी स्वारांना भरधाव येणाऱ्या डंपरने चिरडले. यामुळे दोघेही जागीच ठार झाले आहेत.
रत्नागिरी कोल्हापूर महामार्गाच्या सुरु असलेल्या कामामुळे रत्नागिरी- हातखांबा-पाली या रस्त्यावर ठिक ठिकाणी खोदकाम केल्याने आणि पर्यायी व्यवस्था चांगली नसल्याने रस्त्यावर दगड माती आणि खड्ड्यांचे साम्राज्य आहे. पर्यायी ठेवलेल्या डायव्हर्शन वर दगड माती आणि रोजच्या पडणाऱ्या पावसामुळे चिखलच जास्त आहे. यामार्गावरून पायी चालणे, दुचाकी आणि लहान वाहने चालवणे धोक्याचे झाले आहे. यामुळे या मार्गावर छोटे मोठे अपघात नित्याचेच झाले आहेत.