
कणकवली : मुंबई गोवा महामार्गावर नांदगावच्या पुढे काही अंतरावर पियाळी नदीच्या ब्रिजवर कारचा अपघात झाला. हि कार कणकवली वरून वैभववाडीत जात असताना पहाटे 3 च्या सुमारास मुसळधार पावसात पियाळी पुलाच्या अगोदर वळणार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून कारचा अपघात झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर दोघेजण गंभीर जखमी आहेत.
ही धडक एवढी भीषण होते गाडीच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. घटनास्थळी कणकवली पोलिस व महामार्ग पोलीस धाव घेतली व जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.