STचा अपघात | 2 शाळकरी मुले जखमी

Edited by: नागेश दुखंडे
Published on: November 08, 2023 15:32 PM
views 2398  views

देवगड : ब्रेक फेल झाल्यामुळे तळेबाजार येथून तळवडे टेम्बवलीमार्गे देवगडच्या दिशेने जात असताना खडवी येथे दुपारी २ च्या सुमारास वरेरी- देवगड एस्-टी ला अपघात होऊन त्या अपघातामध्ये २ शाळकरी मुले जखमी झाली आहेत.

जखमींना तातडीने देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी घेऊन जाण्यात आले आहे. बाकीची शाळकरी मुले या प्रकारमुळे भयभीत झाली आहेत. शाळेतील शाळकरी मुलांना, घेऊन जाते वेळी खडवि येथे हा अपघात घडला वरेरी - देवगड या दुपारच्या २.च्या एस् - टी मध्ये ही शाळेतील मुले होती. अशोक मोंडकर यांच्या गोठ्याला जाऊन हि एस -टी धडकली,सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

गेल्या आठ दिवसात 3 रा अपघात याच ठिकाणी झालाय. वारंवार याच उतारावर होणाऱ्या अपघातांमुळे उताराच्या रस्त्याचे रुंदीकरण आणि वळणावर संरक्षक कठडा बांधण्याची मागणी यापूर्वी केली जात होती.