आरपीडी जवळ अपघात...!

Edited by: विनायाक गावस
Published on: June 23, 2023 12:35 PM
views 260  views

सावंतवाडी : संचयनी पॅलेस आरपीडी रोड येथे रुमडाची फळ पडल्यानं या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या दुचाकी स्वारांसह पादचाऱ्यांचा पडून अपघात झाला. यानंतर सावंतवाडी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत परिसर स्वच्छ केला. आरोग्य अधिकारी दीपक म्हापसेकर यांनी न.प.चा अग्निशमन बंब व कचरा गाडीला पाचारण करत वाहतुकीस मार्ग सुयोग्य केला‌. दरम्यान, पावसाळ्यास सुरूवात झाल्यान दुचाकी चालकांनी गाड्या सांभाळून चालविण्याच आवाहन न.प.कडून करण्यात आले आहे.