
कणकवली : देवगड निपाणी महामार्गावर कणकवली तालुक्यातील असलदे डामरे वाडी वळणावर आज सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास खाजगी आरामबस व कार यांच्यात अपघात झाला. या अपघातात कारमधील प्रवासी २ महिला जखमी झाल्या असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, देवगड हुन मुंबईच्या दिशेने जाणारी खाजगी आराम बस तर सांगली हुन देवगडकडे जाणारी कार यांच्यात अपघात झाला. जखमींना नरेंद्र महाराज यांच्या रुग्णवाहिकेतून पांडू तेली यांनी कणकवली येथे उपचारासाठी दाखल केले आहे.