कणकवली कनकनगर रेल्वे ब्रीजखालील खड्ड्यामुळे अपघात | महिला गंभीर जखमी

सुशांत दळवी आणि रिक्षाचालकांनी केली मदत
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 27, 2022 14:43 PM
views 442  views

कणकवली : कनकनगर येथे रेल्वे ब्रीजखाली मोठ्या प्रमाणात खड्डे व रस्त्यावर खडी पडल्याने अपघात होत आहेत. कणकवलीवरून कनकनगरच्या दिशेने जात असताना सविता डेगवेकर (वय 71) रा, कनकनगर यांचा खड्ड्यामध्ये पडून अपघात झाला. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सुशांत दळवी व रेल्वे स्टेशन रिक्षा स्टॉप जवळील रिक्षा चालक यांनी घटनास्थळी धाव घेत ताबडतोब त्यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.  डेगवेकर यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.