कुसूर पिंपळवाडी येथे रिक्षाचा टायर फुटून अपघात

चार जण जखमी
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: November 22, 2025 19:34 PM
views 141  views

वैभववाडी : कुसूर पिंपळवाडी  येथे रिक्षाचा टायर फुटून आज (ता.२२) सायंकाळी पाच वाजता अपघात झाला.या अपघातात चार जण किरकोळ जखमी झाले. जखमींना तात्काळ वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. अपघाताची नोंद वैभववाडी पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास सुरू आहे.

 उंबर्डे येथील रिक्षा चालक गणपत तुकाराम कदम हे वैभववाडीहून कोळपेकडे प्रवाशांसह रिक्षा घेऊन जात होते. कुसूर पिंपळवाडीनजीक  रिक्षा आली असता रिक्षाचा अचानक टायर फुटला आणि वाहनाचा ताबा सुटून रिक्षा पलटी झाली.या अपघातात प्रकाश पांडुरंग साळुंखे (४५), रा. कुसूर,रजिया कमरुद्दिन नावळेकर (३२), रा. कोळपे,अरमान कमरुद्दिन नावळेकर (८), रा. कोळपे, विजय विष्णू सोनाळकर (४२), रा. उंबर्डे हे जखमी झाले.या जखमींवर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले असून धोका नसल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.या अपघाताचा पुढील तपास वैभववाडी पोलीस करत आहेत.