
सावंतवाडी : सावंतवाडी शहरात ठेकेदार व प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे आज सकाळी माय- लेकीची गाडी घसरून अपघात झाला. यात दोघांनाही गंभीर दुखापत झाली असून त्यांचे नातेवाईक आक्रमक झाले आहेत. मनुष्यहानीस कारणीभूत ठेकेदार व प्रशासकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे.
आज सकाळी सावंतवाडी शहरात हा प्रकार घडला. यात माय लेकीला जखमी झाल्या. डोक्यासह पायाला गंभीर इजा झाली आहे. त्यामुळे नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेत संबंधित ठेकेदार, प्रशासकांवर मनुष्य हानीचा गुन्हा दाखल करण्यासाठी मागणी करणार असल्याची माहिती दिली आहे.