मळगाव रेल्वे स्थानकावर अपघात ; युवक जखमी, पायांना गंभीर इजा

Edited by: विनायक गांवस
Published on: August 15, 2023 01:51 AM
views 1160  views

सावंतवाडी : मळगाव रेल्वे स्थानकावरावर सोमवारी रात्री मांडवी व कोकणकन्या एक्सप्रेस क्रॉसिंग दरम्यान रेल्वे प्रवास करणाऱ्या युवकाचा अपघात झाला. हा अपघात नेमका कसा घडला ? हे अद्याप स्पष्टपणे समजू शकलेलं नाही. ओवळीये येथील संदीप रामचंद्र वरक (वय२७)असं या जखमी युवकाच नाव असून या दुर्घटनेत त्याच्या पायाला गंभीर दुखातप झाली आहे. त्याला अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे हलविण्यात आले आहे.


मळगाव रेल्वे स्थानकावर रेल्वेत चढत असताना हा अपघात घडला. जखमी युवकान राजापूर येथील तिकिट काढलं होतं. गाडीत चढत असताना हा अपघात घडला. जखमी अवस्थेत रेल्वे ट्रॅकजवळ पडलेला युवक त्याच अवस्थेत प्लॅटफॉर्मवर चढला. या अपघातात त्याच्या पायाचा तळव्याला गंभीर दुखातप होऊन रक्तस्त्राव झाला. तळव्याचा भाग रेल्वे ट्रॅकवर दिसून आला. परंतू , केवळ स्टेशन मास्तर व गार्ड असे दोघेच जण स्थानकावरावर असल्यानं त्यांना ही घटना समजली नाही. किंवा अन्य गस्तीवरी कर्मचाऱ्यांनी त्याच रिपोर्टींग केल नाही असं स्टेशन मास्तर शेट्ये यांनी सांगितल.


कुणीच आजूबाजूला नसल्यानं अपघातानंतर जखमी अवस्थेत पडलेल्या त्या युवकाने नेमळे भागातील आपल्या मित्रांना घटनेची कल्पना दिली. त्यावेळी रामदास कोकरे, अनुज झोरे, बाबू शेळके व स्थानकावरीर गार्ड सावळ यांनी बेशुद्ध पडलेल्या त्या युवकाला उपचारासाठी हलवल. सुमारे अर्धातास तो रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. मित्रांनी स्थानकासमोरील रिक्षातून त्याला उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र, दुखापत गंभीर असल्यानं त्याला गोवा बांबोळीला हलविण्यात आल असून त्या ठिकाणी अधिक उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळताच पुंडलिक दळवी, देवेंद्र टेमकर, हिदायतुल्ला खान यांनी उपजिल्हा रुग्णालयात जात मदतकार्य केल. त्यानंतर रेल्वे स्थानक गाठत रेल्वे स्थानकावरीलील प्रकाराबाबत स्थानक मास्तरांना जाब विचारला. एवढा वेळ जखमी अवस्थेत पडलेल्या युवकाच्या मदतीस आपण का पोहचला नाही? स्थानकावरील लाईट बंद का केल्या जातात असा सवाल केला. यावेळी वरिष्ठांच्या आदेशानुसार थांबा असलेली गाडी क्रॉसिंग करून गेल्यावर लाईट बंद केल्या जात असल्याच स्थानक मास्तर यांनी सांगितल. तर केवळ दोघेच कर्मचारी स्थानकावर असल्यानं व जखमी युवकाचा अपघाताची कल्पना नसल्याच त्यांनी सांगितल. तसं कोणत्याही प्रकारच रिपोर्टींग स्टेशनवरील गस्तीच्या लोकांकडून झालं नाही असं स्टेशन मास्तर म्हणाले. स्टेशन मास्तर व गार्ड अशा दोन कर्मचाऱ्यांच्या जीवावर स्थानकाचा कारभार व रेल्वेचे पोलीस देखील नसल्यानं प्रशासनाच्या कारभाराबाबत उपस्थितांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अपघातानंतर रेल्वे प्रशासनाकडून म्हणावं त्या प्रमाणात कोणतंच सहकार्य मिळालं नसल्याच जखमी युवकाचे नातेवाईक म्हणाले. उशीरापर्यंत पोलिसांना देखील याची कल्पना त्यांनी दिली नाही. लोकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर सावंतवाडी पोलिसांना या घटनेची कल्पना रेल्वेकडून दिल्याच त्यांनी सांगितलं. यानंतर घटनास्थळी सावंतवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर खंडागळे यांनी दाखल होत घटनेता पंचनामा केला.