कुंभारमाठ इथं दोन कारची समोरासमोर धडक

5 जण जखमी
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: December 08, 2023 18:42 PM
views 311  views

मालवण : कुंभारमाठ सागरी महामार्ग येथे दोन चारचाकी गाड्यामध्ये समोरासमोर धडक बसून अपघात झाला. यात पाच जण जखमी झाले. १०८ रुग्णवाहिकेतून जखमींना ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हा अपघात ४ वाजण्याच्या दरम्यान घडला. 

     कुंभारमाठ सागरी महामार्ग येथे नियंत्रण सुटल्याने दोन चारचाकी गाड्यांमध्ये समोरासमोर जोरदार धडक बसून अपघात झाला. अपघात घडल्याचे कळताच कुंभारमाठ ग्रामपंचायत सदस्य राहुल परब, माजी सभापती मधुकर चव्हाण, माजी उपसरपंच श्री. चव्हाण, ग्रामपंचायत कर्मचारी सिद्धेश गावठे, ग्रामस्थ सुनील वस्त व अन्य नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्यात सहभाग घेतला. या अपघाताची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक बळीराम सुतार, धोंडू जानकर यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. जखमींना तत्काळ १०८ रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 


रुग्णांना ग्रामीण रुग्णालय मालवण येथे 108 रुग्णवाहिकेने हलवण्यात आले पोलीस निरीक्षक सुतार ,हेडकॉन्स्टेबल श्री जानकर साहेब व इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.