LIVE UPDATES

परशुराम सावंत यांचा अपघाती मृत्यू

Edited by:
Published on: May 31, 2026 13:07 PM
views 25  views

सावंतवाडी  : कोलगाव गावातील परशुराम राजाराम सावंत  (वय 65 ) राहणार आकेरी यांचा शनिवारी रात्री घरी जात असताना गंभीर अपघात झाला. परशुराम सावंत हे आपल्या मोटर सायकलने आकेरीत आपल्या घरी जात असताना कुडाळच्या दिशेने सावंतवाडीकडे येत असलेल्या गाडीची आणि  परशुराम सावंत यांच्या  दुचाकीची जोरदार धडक बसून त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. तेथील ग्रामस्थांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे परशुराम सावंत यांना अधिक उपचारासाठी आणण्यात आले. पायाची रक्ताची नस तुटल्याने मोठा रक्तस्त्राव झाला अधिक प्राथमिक उपचार डॉक्टर निखिल अवधूत ऑर्थोपेडिक सर्जन यांनी परशुराम सावंत यांना रक्तस्त्राव झाल्याने सावंतवाडी रुग्णालयात रक्त चढवण्यात आले त्यानंतर लगेचच प्राथमिक उपचार केल्यानंतर गोवा बांबुळी येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले .त्यानंतर  उपचार गोवा बांबुळी इथे करत असताना त्यांचे निधन झाले.

त्यांच्या पक्षात दोन मुलगे व एक मुलगी असून मोठा परिवार आहे.  बातमी मिळताच  कोलगाव येथील ग्रामस्थ, सरपंच राऊळ तसेच उद्योजक उदय मसुरकर, डॉक्टर प्रवीण मसुरकर, जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान अध्यक्ष राजेंद्र मसुरकर व नातेवाईक कोलगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने  सावंतवाडी रुग्णालयामध्ये उपस्थित होते. तसेच रात्री सावंतवाडीतील पोलीस रुग्णालयात जवाब नोंदवण्यासाठी आले होते. परशुराम सावंत यांचे निधन झाल्याने सर्वांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे.