
सावंतवाडी : तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत, तितिक्षा इंटरनॅशनल पुणे आयोजित 'तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार २०२६'चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सावंतवाडी येथील सुप्रसिद्ध कवी दीपक पटेकर यांच्या वृत्तबद्ध कवितांच्या 'बकुळीची फुले' या काव्यसंग्रहाला 'सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह' हा तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार जाहीर झाला आहे. शनिवार दिनांक ०६ जून २०२६ रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या तितिक्षा कला साहित्य संमेलनात ह्या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती मिळत आहे. कवी दीपक पटेकर यांचे विविध स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.










