LIVE UPDATES

परिवहन मंत्री सिंधुदुर्ग दौऱ्यावर

बस स्थानकांची करणार पाहणी
Edited by: उमेश बुचडे
Published on: May 31, 2026 15:07 PM
views 19  views

कणकवली : महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आजपासून  सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध मुख्य बसस्थानकांना भेटी देऊन तेथील प्रवासी सुविधा आणि कामांची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. आज रविवार, ३१ मे रोजी दुपारी देवगड येथे दाखल झाले यावेळी शिवसेना उपनेते संजय आग्रे ,माजी आमदार राजन तेली, कणकवली विधानसभा प्रमुख संदेश पटेल यांनी स्वागत केले आहे.

जिल्ह्यात बरीच बस स्थानक ते सध्या दुरावस्थेत आहेत याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बस स्थानकांची ते पाहणी करणार आहेत त्यानंतर ते कोणता धोरणात्मक निर्णय घेतात ? याकडे लक्ष लागून राहिले आहे. देवगड येथील पाहणी आटोपून दुपारी १:३० वाजता ते सावंतवाडीकडे प्रवासाला सुरुवात करतील. दुपारी ३:३० वाजता सावंतवाडी येथे आगमन होणार असून पुढील वेळ राखीव ठेवण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश बसस्थानकांची अवस्था बिकट आहे. या पार्श्वभूमीवर ते याबाबत कोणती घोषणा करतात याकडे लक्ष लागून राहिले