बस - कारमध्ये भीषण अपघातात

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: December 26, 2025 13:07 PM
views 32  views

कुडाळ : मुंबई गोवा महामार्गावर ओरोस रवळनाथ मंदिराच्या समोर गोव्याकडे जाणाऱ्या मार्गावर आज गुरुवारी सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास लक्झरी बस आणि कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोघेजण  किरकोळ जखमी झालेत. मात्र, सुदैवाने बचावले. यात गाडीचे नुकसान झाले.

याबाबत प्रत्यक्षदर्शी आणि पोलिसांनी दिलेली माहिती अशी मुंबईवरून गोव्याच्या दिशेने लक्झरी बस प्रवासी उतरविण्याकरिता रवळनाथ मंदिरासमोरील रस्त्यावर थांबला होता. त्या दरम्यान गोव्याकडे जाणारी कार भरधाव वेगाने येऊन धडकली अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. कारचा चालकाकडील भाग पूर्णपणे चेपला. यामध्ये दोन प्रवासी होते. सुदैवाने ते किरकोळ जखमी झाले. 

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबतची फिर्याद रघु विमनी यांनी पोलिसात दिल्यावरून भरधाववेगाने व निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात व किरकोळ व गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरल्या प्रकरणी कारचालक गिरीश रमेश काळमेघ (वय 28 ) राहणार खारघर  मुंबई याच्यावर सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे