
वैभववाडी : तळेरे-वैभववाडी मार्गावर उभ्या एस टी बसला मागाहुन आलेल्या डंपरने धडक दिली. हा अपघात कांबळे हॉटेलनजीक थांब्यावर आज दुपारी ३वा झाला.
या अपघातात बसमधील अनुराधा चंद्रकांत काडगे, (६५) चंद्रकांत लक्ष्मण खांडगे (६९) रा.फणसगाव,या प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली.त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अपघातात एसटी चे नुकसान झाले आहे.या अपघाताची पोलीसात नोंद करण्याचे काम सुरू आहे.