एसटी - कारचा अपघात ; विद्यार्थिनी किरकोळ जखमी

Edited by:
Published on: April 03, 2025 11:21 AM
views 530  views

सिंधुदुर्ग  : कुडाळ तालुक्यातील पावशी केसरकरवाडी ग्रामीण रस्त्यावर एसटी आणि इको कारचा अपघात झाला. कुडाळ बामणा देवी कुडाळ शालेय फेरी मारणारी एसटी बस आणि इको कार यांच्यात हा अपघात झाला.

 इको कार मधील विद्यार्थिनी किरकोळ जखमी झालीय. अरुंद रस्त्यावर हा अपघात झाल्याने विद्यार्थी अडकलेत.

या अपघातामुळे वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्यात. घटनास्थळी पोलीस पोहोचण्यास उशीर झाला तर बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली.