दोन डंपर एकमेकांना धडकले

कुडाळमधील युवक गंभीर
Edited by:
Published on: February 23, 2025 18:37 PM
views 665  views

दोडामार्ग : दोडामार्ग बांदा मार्गावर सासोली हेदुस येथे एका डंपरची दुसऱ्या डंपरला मागून धडक बसून मोठा अपघात घडला. हा अपघात एवढा भयानक होता की धडक बसलेल्या डंपरची समोरील दर्शनी भागाचा चेंदा मेंदा झाला. यात चालक कौस्तुभ नंदन मयेकर  ( वय - २२, रा. कुडाळ) हा गंभीर जखमी झाला असून, त्याचा हात आणि पाय फॅक्चर झाला असून त्याच्यावर दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी  गोवा बांबोळी येथे पाठविण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशिकी बांदा मार्गे दोडामार्ग कडे वाळू वाहतूक करणारे दोन डंपर येत होते. सासोली हेदुस येथे पोहचले असता समोर अचानक दुचाकी आल्याने एका डंपरने त्याला धडक बसणार म्हणून ब्रेक मारला. तर त्याचं डंपरच्या मागून असणारा दुसरा डंपर समोरील डंपरला मागून धडकला व मोठा अपघात झाला. हे धडक एवढी जबरदस्त होती की धडक बसलेल्या डंपरचा समोरील दर्शनी भागाचा चेंदा मेंदा झाला व चालक मयेकर हा डंपरच्या केबिन मध्ये अडकून पडला यावेळी त्याच्या डोक्याला व हाता पायाला दुखापत झाली होती. ही घटना स्थानिक ग्रामस्ताना समजताच घटना स्थळी धाव घेतली व मदत कार्यास सुरवात केली. यावेळी अडकून पडलेल्या चालकाला बाहेर काढून दोडामार्ग ग्रामीण रुग्णालंय येथे पाठविले. त्याठिकाणी त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला अधिक उवचारसाठी गोवा बांबोळी येथे पाठविले.