मणेरी पुलावर दुचाकींचा अपघात ; तिघे गंभीर जखमी

Edited by: लवू परब
Published on: February 05, 2025 20:15 PM
views 486  views

दोडामार्ग : दोडामार्ग बांदा मार्गावर मणेरी पुलावर दुचाकी अपघात झाला. यात तिघे तरुण गंभीर जखमी झालेत. अधिक उपचारासाठी त्यांना गोव्यात हलविण्यात आलंय. 

संदेश जंगले, वय ४० रा. सासोली, संदीप श्रीकांत सावंत, वय ४० रा. कुडाळ, सूरज अनंत धोंड, वय २६, रा. शिरशींगे हे तिघे जण जखमी झालेत. तिघांना दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आल होतं. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी गोवा येथे पाठविण्यात आले . 

 याबाबत अधिक माहिती अशी की दोडामार्ग बांदा मार्गावर मणेरी तिलारी नदीच्या पुलावर दोन दुचाकींची समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात सासोली येथील संदेश जंगले यांच्या पायाला दुखापत झाली. कुडाळ येथील संदीप सावंत याच्या पायाला तर शिरशींगे येथील सुरज धोंड यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्या तिघांना अधिक उपचारासाठी गोवा येथे पाठवण्यात आले.