
दोडामार्ग : दोडामार्ग विजघर मार्गावर दुचाकी व गाय यांच्यात आपघात होऊन गायीचा मृत्यू झाला. मात्र दुचाकी स्वार जखमी झाला असून दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे.
कोनाळ ग्रामपंचायत क्षेत्रात असलेल्या तिलारीवाडी ते कोनाळकट्टा दरम्यान रस्त्यावर बसवलेले काही पथदिवे बंद आहेत. यामुळे राञीच्या वेळी रस्त्यावर बसलेली गुरे लक्षात येत नाही. दोडामार्ग ते विजघर बेळगाव मुख्य रस्त्यावर तिलारीवाडी येथे रस्त्यावर असलेली गाभण गाय मोटार सायकल युवकाला दिसली नाही. यामुळे मोटार सायकलची गायीला धडक बसून यात गाभण गायीचा दुदैवी मृत्यू झाला. येथील ज्ञानेश शेटवे यांची गाय होती तर शेटकर नामक मोटार सायकल युवक जखमी झाला. त्याला साटेली भेडशी आरोग्य केंद्र येथे उपचार करून घरी पाठवले. मोटार सायकलचे देखील नुकसान झाले. सोमवारी रात्री हा अपघात घडला.
दोडामार्ग ते विजघर बेळगाव मुख्य रहदारीचा मार्ग दिवसरात्र वाहनाची ये जा सुरू असते. शिवाय तिलारी आंतरराज्य प्रकल्प आहे. यामुळे कोनाळकट्टा ते तिलारीवाडी दरम्यान कोनाळ ग्रामपंचायतवतीने पथदिवे लावले आहेत. पण काही बंद अवस्थेत आहेत. स्थानिक ग्रामस्थ यांनी मागणी करुन देखील ते चालू केले नाही. यामुळे रात्री रस्त्यावर अंधार असतो यामुळे रस्त्यावर बसलेली गुरे दिसत नाही.
अंधाऱ्या रात्री मोटार सायकल गाईची धडक बसून मुलगा गंभीर जखमी होऊन गाईचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली. ही घटना आपल्या गावकऱ्यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी, विशेषत: रात्रीच्या वेळी योग्य पथदिवे लावण्याची नितांत गरज आहे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करत आहेत.