अवघड वळणावर दुचाकी - कारची समोरासमोर धडक

युवक गंभीर जखमी
Edited by: लवू परब
Published on: December 21, 2024 19:35 PM
views 24  views

दोडामार्ग : तेरवण - मेढे येथील एका अवघड वळणावर दुचाकी व कारची समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात हेवाळेतील एक युवक गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. त्याला अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे हलविण्यात आले आहे.

गोवा येथील काही जण मारुती सुझुकी एस्प्रेसो कारने विजघरकडे जात होते. तर हेवाळेतील युवक बुलेटने साटेली भेडशीला येत होता. दोडामार्ग ते विजघर राज्यमार्गावरील तेरवण-मेढे परिसरात असलेल्या गेल कंपनीच्या ऑफिस जवळील एका अवघड वळणावर कार व बुलेटची समोरासमोर धडक बसली.  या अपघातात युवकाच्या पायाला व हाताला मार लागला. मार्गस्थ होणारे मदतीसाठी सरसावले. शिवाय अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी धाव घेतली. जखमी युवकाला उपचारासाठी गोवा बांबोळी येथील रुग्णालया हलविण्यात आले. अपघातामुळे मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. अपघातात बुलेट व कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.