
माणगाव : माणगाव पोलीस स्टेशन हद्दीत ताम्हीणी घाटात एक खाजगी बस क्रमांक. MH 14 GU 3405 अपघात होऊन पलटी झाली आहे. जाधव कुटुंबीय लोहगाव पुणे येथून बिरवाडी महाड येथे लग्न समारंभास जात असताना ताम्हीणी घाटातील धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही गाडी पलटी झाली आहे. यामधे २ पुरुष व ३ महिला अशा एकूण ५ जणांचा मृत्यू झाला आहे. २७ जखमी लोकांना बाहेर काढून माणगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. बचाव पथकासह पोलिस घटनास्थळी काम करत आहेत.
या दुर्घटनेतील मयतांची नावे खालीलप्रमाणे-
1) संगिता धनंजय जाधव
2)गौरव अशोक दराडे
3) शिल्पा प्रदिप पवार
4) वंदना जाधव
5) अनोळखी पुरुष अजुन नांव निश्चित नाही