दोडामार्ग : दोडामार्ग आयी मार्गांवर साईबाबा मंदिर येथे दुचाकी डंपर मध्ये अपघात होऊन दीपिका देवेंद्र गवस (35) व देवेंद्र जगन्नाथ गवस ( 38) हे दोघे पती पत्नी जखमी झाले. त्यांना दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय येथे प्राथमिक उपचार करून गोवा बांबोळी येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. मात्र या अपघातात दुचाकीचे ही मोठे नुकसान झाले.
बांदा दोडामार्ग मार्गे आयी गावच्या दिशेने वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर ने हॉटेल ला पाव विक्री करणाऱ्या दाम्पत्याला समोरासमोर धडक दिली ही धडक एवढी भयानक होती की त्यांच्या दुचाकीचा चेंदा मेंदा झाला. हा अपघात मंगळवारी पहाटे 5.00 वाजण्याच्या सुमारास घडला. त्यावेळी वाऊस सुरु असल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
डंपर मध्ये बेकायदा वाळू असल्याने त्या डंपर चालकाने वाळू तेथेच रत्याच्या बाजूला ओतली. जेणेकरून त्याच्यावर करवाई होऊ नये मात्र या अपघाता बाबत दोडामार्ग पोलिसात नोद नसल्याचे सांगण्यात आले.