
दोडामार्ग : तिलारी घाटातील जयकर पॉईंट येथे टोमॅटो वाहतूक करणारा टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. मालासह गाडीचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने चालक व वाहक बचावले. महिंद्रा बोलेरो पिकअप गाडी बुधवारी पहाटेच्या सुमारास टोमॅटो घेऊन बेळगाव हून तिलारी घाटमार्गे गोव्याला जात होती. दरम्यान, तिलारी घाट उतरत असताना जयकर पाॅईंट येथील तीव्र उतारावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. गाडी रस्त्याकडेला जात पलटी झाली. अपघातात गाडीतील टोमॅटोचे मोठे नुकसान झाले. टेम्पोतील टोमॅटो बाहेर काढले व त्यानंतर पलटी गाडी सरळ केली.