कोलगाव मारुती मंदिर जवळ अपघात !

Edited by: विनायक गांवस
Published on: September 28, 2024 12:03 PM
views 693  views

सावंतवाडी : कोलगाव मारुती मंदिर येथील निकिता जयवंत कुडतरकर यांचा मियांसाब समाधी समोर अपघात झाला. नागरिकांनी त्यांना लगेचच उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार करण्यासाठी दाखल केले. यावेळी प्राथमिक उपचार करून तिला गोवा बांबुळी येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. तिची प्रकृती स्थिर असून अपघातग्रस्त महिलेला नागरिकांनी व जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी सहकार्य केले.