
वेंगुर्ला : तालुक्यातील तुळस येथे सावंतवाडी वेंगुर्ला मुख्य मार्गावर जैतीर मंदिर नजीक मुंबईला जाणाऱ्या चाकरमान्यांच्या बसला अपघात होऊन यात ५ जण प्रवासी जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. अपघातग्रस्त बस मधील सर्व प्रवाशांना स्थानिक ग्रामस्थांनी बस मधून सुखरूप बाहेर काढले आहे तर जखमींना वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.