दोन एसटीची समोरासमोर धडक !

Edited by: ब्युरो
Published on: September 09, 2024 06:11 AM
views 86  views

देवगड : तळेरे ते विजयदुर्ग मार्गावर अपघात झाला. विजयदुर्ग - पणजी व इचलकरंजी - विजयदुर्ग या एसटीची समोरासमोर धडक बसून हा अपघात झाला. विजयदुर्ग बस मधून मुंबई वरून आलेले चाकरमानी घरी जात असताना हा अपघात घडला. 25 ते 30 जणांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील 5 जण हे गंभीर जखमी आहेत तर 12 जण किरकोळ जखमी आहेत. 

काही अपघातग्रस्त घटनास्थळा जवळील रुग्णालयात उपचार घेत आहेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील डॉक्टर, सुबोध इंगळे यांच्याकडून माहिती प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या   उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंकज पाटील यांनी डॉ. सचिन डोंगरे, डॉ. रेड्डी तसेच कार्यरत इतर तज्ञ डॉक्टर, सर्व स्टाफ आणि आपात्कालीन पथकाच्या  सहाय्याने तातडीने औषधोपचार करून फणसगाव येथून आलेल्या 12 रुग्णांना उपचार सुरू आहे. त्यातील पाच हे गंभीर जखमी आहेत, 2 जणांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.