स्विफ्टची धडक ; रिक्षा गेली मळ्यात !

Edited by: कृष्णां ढोलम
Published on: September 08, 2024 14:05 PM
views 1487  views

मालवण : स्विफ्ट व रिक्षा यांच्यात झालेल्या अपघातात रिक्षा चालकासह तीन प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात मालवण सागरी महामार्गावर दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास घडला. स्विफ्ट चालकाने रिक्षाला मध्यभागी उजव्या बाजूने धडक दिली यावेळी रिक्षा नजीकच्या मळ्यात कलंडली. यात वर्षा भालचंद्र नागवेकर वय 51 (रा कुडाळ बिबवणे) या महिलेच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली असून जखमींना जिल्हारुग्णालयात हलविण्यात आले.


कुडाळ वेतोरा येथील रिक्षा चालक अशोक अर्जुन लटम हे आपल्या रिक्षा मधून इशांत भालचंद्र नागवेकर, वर्षा भालचंद्र नागवेकर व भालचंद्र नारायण नागवेकर या तीन प्रवाशांना घेऊन कुडाळ बिबवणे येथून मालवण कांदळगाव येथे जात असताना देवगडवरून कुंभारमाठच्या दिशेने जाणाऱ्या स्विफ्ट चालकाने रिक्षाच्या मध्यभागी उजव्या बाजूला जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षा नजीकच्या मळ्यात कोसळली. रिक्षा चालक व प्रवासी खाली कोसळले यातील वर्षा नागवेकर या महिलेला गंभीर दुखापत झाली आहे. अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी रिक्षामधील प्रवाशाना बाहेर काढले व मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमींवर डॉ अतुल महादळे डॉ अहमद यांनी उपचार असता. अधिक उपचारासाठी  त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. घटनास्थळी पोलीस कॉन्स्टेबल सुशांत पवार महादेव घागरे शरद गुहाटे यांनी भेट देऊन पंचनामा केला.