
वेंगुर्ला: वेंगुर्ला शहरातील गाडी अड्डा नाका येथे काल रात्री ११.३० वाजताच्या दरम्याने अज्ञात रुग्णवाहिका व दुचाकीत अपघात होऊन अणसूर येथील रहिवासी वेंगुर्ला वीज वितरण विभागाचे कर्मचारी वरीष्ठ तंत्रज्ञ बाळा शंभा गावडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर त्यांच्या सोबत असलेले बाह्यस्रोत कर्मचारी संदेश सत्यवान शिरोडकर यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
वेंगुर्ला दाभोली नाका येथे दाभोली रस्ता परिसरात वीजदुरुस्तीचे काम करण्यासाठी रात्री ११.३० च्या दरम्याने बाळा गावडे व संदेश शिरोडकर दुचाकीने जात असताना अज्ञात रुग्णवाहीकेने त्यांना धडक दिली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. यानंतर दोघानाही उपचारासाठी गोवा बांबूळी येथे दाखल करण्यात आले. मात्र अपघातानंतर बराच वेळ रस्यावर पडून राहील्यामुळे व दुखापत गंभीर असल्या कारणाने अपघातग्रस्त बाळा शंभा गावडे यांचे उपचारादरम्यान दुखःद निधन झाले. तर संदेश शिरोडकर हे गंभीर जखमी असुन त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.