
सावंतवाडी : रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने झाराप येथे दुचाकीचा अपघात झाला. यात जयश्री भागोजी तेंडुलकर राहणार पेंडूर, मालवण यांना दुखापत झाली. पती समवेत मातोंड गावी पाहुण्यांकडे जात असताना झाराप झिरो पॉईंट येथे त्यांचा अपघात झाला.
यावेळी राजू तेंडुलकर यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये त्यांना दाखल केलं. डॉक्टरांकडून प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे त्यांना पाठवण्यात आले.