
सावंतवाडी : बातमी अपघाताची... सावंतवाडी तालुक्यातील दाणोली गावच्या धोकादायक वळणावर अपघात घडला. या अपघातात कार पलटी झाली. पांढऱ्या रंगाची ही स्विफ्ट कार होती. आज शनिवारी सव्वानऊच्या दरम्याने हा अपघात घडला.
सुदैवाने कार पलटी होऊनही गंभीर दुखापत झाली नाही. ही कार कोल्हापुराहून दाणोली मार्गे सावंतवाडीच्या दिशेने येत होती. धोकादायक वळणाचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला असावा, अशी प्राथमिक माहिती मिळते. या कारमधून चार जण प्रवास करत होते. सुदैवाने खरचटण्याव्यतिरिक्त गंभीर दुखपात कोणालाही झाली नाही. चारही प्रवासी सुखरूप आहेत. कार पलटी होताच स्थानिक, इतर प्रवाशांनी त्यांच्या मदतीसाठी धाव घेतली. अपघाताची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते. अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली.