मंजूर कामांचं श्रेय घेण्याचा 'मविआचा' केविलवाणा प्रयत्न : राजन चिके

फोंडाघाट बाजारपेठमधील रस्त्याचे होणार रुंदीकरण
Edited by: उमेश बुचडे
Published on: October 14, 2022 14:34 PM
views 290  views

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक मोठी बाजारपेठ म्हणून फोंडाघाट बाजारपेठ प्रसिद्ध आहे.फोंडाघाट बाजारपेठेतून जाणारा मुख्य रस्ता देवगड - निपाणी महामार्ग अत्यंत खराब झाला होता. अक्षरशः रस्त्याची चाळण झाली होती. याबाबत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजन चिके यांनी आ.नितेश राणे यांचे लक्ष वेधले होते.

     महाराष्ट्रात गेली अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार असताना स्थानिक जिल्हा परीषद सदस्य  सत्ताधारी पक्षाचा रस्त्याचे काम मंजूर होऊ शकले नाही.परंतु महाराष्ट्रात भाजप - शिवसेनेचे सरकार येताच सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांच्याच माध्यमातून फोंडाघाट रस्ता मंजूर झाला असून त्या कामाची निविदा प्रक्रिया होऊन लवकरच प्रत्यक्षात कामाला सुरुवात देखील होईल.

        परंतु ज्यांना ५ वर्षे संजय आग्रे हे जिल्हा परिषद सदस्य असताना आणि अडीच वर्षे राज्याच्या सत्तेत असताना जमले नाही त्यांनी काम  मंजूर झाल्याचे समजताच मंजूर झालेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी जिल्ह्यात नवीनच हजर झालेले सेवेचा पहिला दिवस असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम चे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांची   भेट घेतली व मंजूर कामाची माहिती घेऊन आपणच पाठपुरावा केल्याचे भासवत आहेत.जे काम आपण केलेच नाही ते केल्याचे भासवत आहेत ते गेली अडीच वर्षे सत्तेत असताना झोपी गेले होते का? असा सवालही भाजापा जिल्हा उपाध्यक्ष राजन चिके यांनी विचारला.

    फोंडाघाट गावातील जनता सुज्ञ आहे.त्यांना माहिती आहे की,रस्ता मंजूर करण्याचे काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातूनच झालेले आहे. त्यामुळे रस्ता आपल्याच पाठपुराव्याने मंजूर झाला असे भासवणाऱ्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून गेली ५ वर्षे व राज्यातल्या सत्तेतली अडीच वर्षे आपल्या जिल्हा परिषद विभागात कोण कोणती विकासकामे केलीकाय ते आधी जाहीर करावे. उलट विकास कामांना खो घालणे आणि कित्तेक वर्ष चालू असणारे उद्योग बंद करण्यासाठीं आपल्या पदाचा गैरवापर केला असल्याचे चिके यांनी सांगितले.