
सावंतवाडी : शिवसेना आमदार वैभव नाईक शिवसेनेसोबत निष्ठेनं राहिल्यानं गद्दार खोका सरकारने एॅन्टी करप्शनकडून चौकशीची नोटीस देऊन वैभव नाईक यांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्या कुडाळ येथे महाविकास आघाडीच्या माध्यमातून एॅन्टी करप्शन कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी केल आहे.
वैभव नाईक यांच्यावर कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी वैभव नाईक याला बळी पडणार नाहीत. याआधी देखील नाईक यांनी दहशतवाद विरोधात लढा दिला होता. त्यामुळे वैभव नाईक आशा धमक्यांना भिक घालणार नाहीत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कट्टर शिवसैनिक कार्यकर्त्यांना पैशाचे आमीष दाखवून आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, शिवसेनेचे संस्कार झालेले कार्यकर्ते काही झाले तरी या आमिषाला बळी पडणार नाहीत. जिल्ह्यात असे अनेक मोठे उद्योजक आहेत जे राजकारणात आहेत. मात्र, त्यांची चौकशी न करता वैभव नाईकांवर दबाव टाकला जात आहे असं पडते म्हणाले. यावेळी सेना नेते अतुल बंगे,चंद्रकांत कासार, आबा सावंत आदी उपस्थित होते