
चिपळूण : एसीबी इंटरनॅशनल स्कूल मधून अँड.अमोल भोजने यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य देशांमध्ये शिकवला जाणारा अभ्यासक्रम आणि शिक्षण पद्धती सध्याच्या पिढीसाठी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाची आहे श्री.भोजने वैयक्तिक लक्ष देऊन मुलांमध्ये शैक्षणिक, कला, क्रीडा क्षेत्रामध्ये लक्षणीय कामगिरी करत आहेत त्यांच्या या शैक्षणिक कार्याला मनापासून शुभेच्छा देतो. एसीबी इंटरनॅशनल स्कूलचे शैक्षणिक कार्य उल्लेखनीय आहे. अशा शब्दात चिपळूणचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.राजेंद्रकुमार राजमाने यांनी येथे बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली. चिपळूण शहरानजीक असणाऱ्या कापसाळ गावी वसलेल्या एसीबी इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन शनिवारी सायंकाळी मोठ्या दिमाखात दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले यावेळी राजमाने बोलत होते.
सध्याच्या युगात वाढते सायबर क्राईम लक्षात घेता पालकांनी आपल्या मुलांवर बारीक लक्ष ठेवले पाहिजे.मुलांचा मोबाईचां अतिवापर कमी केला पाहिजे सर्वात सायबर क्राईम मोबाईलवरील फेक जाहिराती आणि अश्लील वेब साईट यामुळे मुलांची फसवणूक होत आहे. आपला मुलगा मोबईलवर काय पाहतोय कोणती साईट उघडतोय याची परिपूर्ण काळजी पालकांनी घेणे गरजेचे आहे असे आवाहन राजमाने यांनी केले.डीवायएसपी राजेंद्रकुमार राजमाने, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस जयद्रथ खताते, युवानेते अनिरुद्ध निकम, चिपळूण अर्बन बँक अध्यक्ष मोहन मिरगल, सतीश खेडेकर, अँड.अमोल भोजने, उद्योजक चंद्रकांत भोजने, डॉ.राकेश चाळके, राकेश टिळक, एसीबी इंटरनॅशनल स्कूल चेअरमन सायली भोजने, संजय जाधव आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
अँड. अमोल भोजने यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले. श्रीदेवी सरस्वती देवीच्या पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. मी शिक्षणानिमित्त काही वर्ष प्रदेशात होतो तेथील शिक्षण पद्धती आणि एसीबी इंटरनॅशनल स्कूलमध्ये मुलांना दिले जाणारे शिक्षण जवळ जवळ सारखेच आहे माझ्या बालवयात मी असाच मुलांच्या आनंद साजरा करायचो या शाळेतून भविष्यात शिक्षण घेणारे मुले देशात उच्च पातळीवर काम करणारी मुले घडतील भोजने कुटुंबीय वैयक्तिक मुलांवर लक्ष देऊन त्यांना शिक्षणात पाठबळ देत आहेत ही अभिमानास्पद बाब आहे.शाळेतील सोयी सुविधा पाहता अद्यायावत असे दर्जेदार शिक्षण इथे दिले जात आहे. स्कूलच्या सर्व उपक्रमांना मी मनापासून शुभेच्छा देतो अशा शब्दात आमदार शेखर निकम यांचे चिरंजीव अनिरुद्ध निकम यांनी आपल्या मनोगत भाषणात बोलताना दिल्या.
गणेश आराधना, भक्ती गीते, देशभक्तीपर गीत, मराठी, हिंदी जुनी नवीन चित्रपट गाणी यावर नृत्य करून आपल्यातील कलागुण सादर केले. इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सर्व धर्म समभावचा नारा देत नृत्य सादर केले. मुलांनी सादर केलेल्या उत्कृष्ट डान्स मुळे उपस्थित पालक वर्गाचाही उत्साह शिगेला पोचला होता. आकर्षक विद्युत रोषणाई डीजे च्या तालावर विद्यार्थी थिरकताना दिसत होते. संचालक पूजा खताते, खेर्डी ग्रामपंचायत सदस्य अभिजीत खताते, गुणवत्ताधिकारी नेहा महाडिक, मुख्याध्यापक राकेश भुरण, पर्यवेक्षक मुकुंद ठसाळे, संपूर्ण स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन आयशा सरगुरोह, मुकुंद ठसाळे यांनी केले.