
देवगड : राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी विधानसभा निवडणुकीच्या आमदार नितेश राणे यांच्या प्रचारासाठी देवगड तालुक्यातील विजयदुर्ग, गिरये येथे घरोघरी प्रचार केला त्याचबरोबर मोंड,बापारडे येथे गाव सभा घेतल्या. या सभेत जिल्हाध्यक्ष अबिद नाईक बोलताना सांगितले कणकवली विधानसभा मतदारसंघात आमदार नितेश राणे यांनी गेल्या दहा वर्षात विकासाची गंगा आणली. नितेश राणे यानी देवगड तालुका पर्यटनाच्या नकाशावर नेला आज विजयदुर्ग देवगड येथे पर्यटकांची संख्या वाढली असल्याच नाईक म्हणाले.
त्याचबरोबर नितेश राणे यांनी अनेक रुग्णांवर मोफत उपचार केले नितेश राणे यांचे तळागाळातील लोकांशी जवळचे संबंध त्यामुळे आमदार नितेश राणे यांचा 60 हजार पेक्षा जास्त मताधिक्याने विजय निश्चित आहे.
राष्ट्रवादी पक्ष आमदार नितेश राणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्यावेळी राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सावळाराम अनावकर, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, प्रांतिक सदस्य विलास गावकर्, देवगड राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष रशीद खान भाजप देवगड तालुकाध्यक्ष बंडू नारकर ,राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य बाळा कोयडे,राष्ट्रवादी जिल्हा सचिव प्रसाद कुलकर्णी, भाजप माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश राणे, अजित राणे, सुरेश देवगडकर, सायली कोयडे माजी सरपंच रविंद्र अनभवने व मोठ्या प्रमाणात महिला भगिनी उपस्थित होते.