
कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक १७मधून नगरसेवकपदासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक रिंगणात आहेत. नाईक यांनी घरोघरी प्रचार करण्यावर भर दिला आहे.
प्रभाग क्रमांक १७ मधून नगरसेवकपदासाठी अबिद नाईक हे निवडणूक लढवत आहेत. भाजप-राष्ट्रवादी युतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे यांनी अबिद नाईक यांच्या प्रचाराचा नुकताच शुभारंभ केला होता. नाईक यांनी डोअर टू डोअर प्रचार करण्यावर भर दिला आहे.
त्यांच्या प्रचारार्थ भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत हे मैदानात उतरले आहेत. युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत कडुलकर देखील त्यांच्या प्रचारात सहभागी झाले आहेत. नाईक यांना प्रचारात चांगला प्रतिसाद मिळत आहे.










