अबिद नाईक राष्ट्रवादीचे सदस्यच नाहीत ? ; काय म्हणाले अमित सामंत ?

Edited by: भरत केसरकर
Published on: July 07, 2023 14:45 PM
views 481  views

कुडाळ : अबिद नाईक हे राष्ट्रवादीचे सदस्यच नाहीत असा दावा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९०% राष्ट्रवादी ही शरद पवार यांच्या सोबत आहे, असा दावा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केला. कुडाळ येथील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 

       यावेळी सामंत म्हणाले जी खरी राष्ट्रवादी सोडून गेले त्यांचा सर्वस्वी निर्णय जयंत पाटील यांनी घेतलेला आहे. ज्यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे,तो वरून जयंत पाटील यांच्या कडून आदेश आला आहे. यामध्ये जिल्हाध्यक्षांचा काहीही विषय नाही. यामध्ये ज्यांची हकालपट्टी झालेली आहे. त्यांनी थेट जयंत पाटील यांची भेट घेऊन खुलासा करावा. तसेच शरद पवार हे देखील उपलब्ध आहेत. त्यांना भेटून खुलासा करावा. आणी विचाराव की आमची का हकालपट्टी करण्यात आली? त्यामुळे काका कुडाळकर यांच्यासह ९ जणांची हकालपट्टी ही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार करण्यात आल्याचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

तर येत्या ११ तारीखपासून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षवाढीसाठी केला जाईल असेही ते म्हणाले. यावेळी प्रसाद रेगे,सचिन पाटकर,सौ.सावली पाटकर उपस्थित होते.