अबिद नाईक यांनी दिल्या मंत्री रवींद्र चव्हाण यांना शुभेच्छा !

Edited by: उमेश बुचडे
Published on: September 11, 2023 15:18 PM
views 65  views

कणकवली : राष्ट्रवादी पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या केसरी येथील फिश अक़्वारियम, बर्ड अक़्वारियम उद्धघाटन प्रसंगी भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या केसरी येथील फिश अक्वारियम, बर्ड अक्वारियम प्रकल्पाच्या उद्धघाटनासाठी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांना पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी निमंत्रित केले होते. त्या उद्धघाटनानिमित्त पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांना जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. त्यावेळी सुभाष सावंत, विलास गावकर, गणेश चौगुले, महेश सावंत, केदार खोत उपस्थित होते.