मविआच्या जिल्हा मित्रपक्ष संमेलनासाठी समन्वय प्रमुखपदी अबिद नाईक

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली जबाबदारी
Edited by: उमेश बुचडे
Published on: January 09, 2024 19:11 PM
views 92  views

कणकवली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजपा, शिवसेना व सहयोगी पक्षांच्या 'जिल्हास्तरीय मित्रपक्ष संमेलना'साठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने 'जिल्हा समन्वय प्रमुख' पदांची जबाबदारी देण्यात आली असून सिंधुदुर्ग जिल्ह्याची जबाबदारी राष्ट्रवादीचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष अबिद नाईक यांच्याकडे देण्यात आली आहे. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही नियुक्ती केली आहे.

राष्ट्रवादीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सिंधुदुर्गात राष्ट्रवादी पक्ष वाढीसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. संघटनात्मक काम करताना पक्षातील पदाधिकाऱ्यांबरोबरच कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन संघटना वाढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देत असल्याची दखल घेऊन राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेतृत्वाने घेत अबिद नाईक यांच्याकडे ही जबाबदारी दिली आहे. अन्य जिल्ह्यांमध्ये आमदार खासदार यांच्याकडे जबाबदारी देत असताना सिंधुदुर्गात अबिद नाईक यांच्याकडे जिल्हा समन्वय प्रमुख' पदांची जबाबदारी देत अबिद नाईक यांच्या नेतृत्वाचा सन्मान केला आहे.

कोकणामध्ये देण्यात आलेल्या नियुक्तीमध्ये  

ठाणे - आनंद परांजपे, (जिल्हाध्यक्ष व माजी खासदार),

रायगड -अनिकेत तटकरे, (वि. प. स), रत्नागिरी - शेखर निकम (वि. स. स.) यांची निवड केली असून 

सिंधुदुर्गची जबाबदारी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्याकडे देण्यात आली आहे.