
सिंधुदुर्ग : राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी शिवजयंती निमित्त अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराजांच्या कणकवली शिवाजी महाराज चौक येथील महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
त्यावेळी शिवाजी चौक मित्रमंडळ यांचे आनंद पारकर, कल्याण पारकर, राष्ट्रवादी कणकवली तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, प्रांतिक सदस्य विलास गावकर्, पत्रकार रमेश जोगळे, आदी उपस्थित होते.