उद्धव ठाकरे यांच्या दिर्घायुष्यासाठी वैभववाडीत अभिषेक

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 27, 2023 19:21 PM
views 226  views

वैभववाडी : ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिर्घायुष्य लाभावे याकरिता शहरातील दत्तमंदिरात अभिषेक करण्यात आला. श्री ठाकरे यांना दिर्घायुष्य लाभावे म्हणून देवाला साकडे घालण्यात आले. वैभववाडी तालुका शिवसेनेच्या वतीने या कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले होते.

   श्री.ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त  तालुक्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.सकाळी शहरातील दत्त मंदिरात अभिषेक सोहळा संपन्न झाला. यावेळी उपस्थित शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ठाकरे यांना उदंड निरोगी आयुष्य मिळावे असे देवाला साकडे घातले.

या कार्यक्रमाला तालुका प्रमुख मंगेश लोके, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप सरवणकर,माजी जिल्हा बँक संचालक दिगंबर पाटील, युवासेना जिल्हा सरचिटणीस स्वप्नील धुरी, शहरप्रमुख शिवाजी राणे, महीला शहर प्रमुख मानसी सावंत, नगरसेवक मनोज सावंत गणेश पवार, सुनिल पवार, श्रीराम शिंगे, विलास पावसकर, सुनील रावराणे, वामन करकोटे, सिद्धेश रावराणे यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.