अबब....सलुन दुकानाचे वीज बिल तब्बल २९०७० रूपये

कुडाळ येथील सलून व्यवसायीक शुभम चव्हाण याला वीजवितरनाचा शाॅक
Edited by:
Published on: December 31, 2022 15:01 PM
views 694  views

कुडाळ:....अबब....सलुन दुकानाचे तब्बल २९०७० रूपये ऐवढे आले आहे बिल.या बिलामुळे युवा सलून व्यावसायिक शुभम रविंद्र चव्हाण हे चक्रावून गेले आहेत.माहे डिसेंबर २०२३ चे एका महिन्याचे लाईट बील चक्क  २९ हजार आल्याने कुडाळ नविन एस.टी.डेपो समोरील नविन सलून व्यवसाय सुरू केलेल्या शुभम चव्हाण याला एक प्रकारचा वीजवितरण ने शाॅकच दिला आहे.वीजवितरण कार्यालयाशी त्याने भेट देत बील कमी करण्याची विनंती केली आहे.पण वीजवितरण च्या कर्मचारी वर्गाने पहिल्यांदा बील भरा नाहीतर कनेक्शन तोडण्याची धमकीच दिली आहे.परब मॅडम नामक महिला कर्मचारी वर्गाच्या या दंडुकशाहीला कुडाळातील जनताच कंटाळली आहे.