
सावंतवाडी : आजगाव धाकोरा येथील पाणंद खुली करण्याच्या शासनाच्या धोरणाविषयी स्थानिक रहिवासी असलेल्या आरती प्रभू राळकर यांनी आक्षेप नोंदवला असून शासन अन्याय करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आमच्याच जमिनीत शासनाकडून अतिक्रमण होत आहे. या विरोधात मी उपोषण छेडणार असून आमच्यावरच अन्याय का असा सवाल उपस्थित केला आहे.
राळकर यांचे बुधवारी ग्रामपंचायत तसेच महसूल प्रaajgav शासनाकडून अनेक वर्षाचे कंपाउंड काढून रस्ता खुला करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी या विरोधात गटविकास अधिकारी तहसीलदार यांच्याकडे तक्रार अर्ज दिले आहेत.
आजगाव धाकोरे चव्हाट्यावाडी येथील आरती प्रभूराळकर याच्या जमिनीतून पाणंद रस्ता काढण्यात येत आहे.मात्र हा पाणंद रस्ता खुला करण्यात येत असतनाच त्याचे अनेक वर्षाचे कंपाऊंड काढून टाकण्यात येणार आहे.या बाबतीत धाकोरे ग्रामपंचायत कडून नोटीस ही बजावण्यात आली असून या नोटीस विरोधात प्रभूराळकर यांनी सर्व कार्यालयात दाद मागितली. मात्र, न्याय मिळाला नाही. यामुळे प्रभूराळकर यांनी आता उपोषणाचा इशारा दिला असून,माझी कोणतीही समंती नसतना थेट आमच्याच जमिनीतून हा रस्ता काढण्यात येत आहे.तसेच अनेक वर्षाचे कंपाउंड काढून टाकण्यात येत आहे.मग हा आमच्यावरच अन्याय का? असा सवाल प्रभूराळकर यांनी केला असून हे अतिक्रमण थांबवा अन्यथा आपण उपोषण करणार आहे असे सांगितले आहे.
याबाबत तहसिलदार श्रीधर पाटील यांना विचारले असता आम्ही प्रभूराळकर यांची दिड गुठे जमीन घेत असून यातून अनेक वर्षांनंतर तेथील घरांना रस्ता मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे.