
सावंतवाडी : कोकणचं नंबर 1 महाचॅॅनेल कोकणसाद LIVE, कोकणसादच्या आरती संग्रहाच प्रकाशन सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले, मुख्य संपादक सागर चव्हाण, दोडामार्ग बायोफ्युल्स प्रोड्यूसर कंपनीचे एम.डी. हरिहर मयेकर, श्रीराम बोअरवेल्सचे आशुतोष पाटील, ब्युरो चीफ संदीप देसाई आदींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आल. कोकणसादच्या सावंतवाडी येथील प्रधान कार्यालयात हा प्रकाशन सोहळा पार पडला.
या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचं मुख्य संपादक सागर चव्हाण, ब्युरो चीफ संदीप देसाई यांनी स्वागत केले. सुरुवातीला कोकणसादचे मुख्य संपादक सागर चव्हाण यांनी प्रास्ताविक करत असताना कोकणसाद LIVE आणि कोकणसादनं राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कोकणचा सण असणाऱ्या गणरायाच्या स्वागतासाठी कोकणवासीय सज्ज झाला आहे. दोन वर्ष कोरोनामुळे या उत्सवावर बंधन होती. मात्र, आता यातुन मुक्त होत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गणेशभक्त सज्ज झालेले असताना आरती संग्रहाच्या माध्यमातून हा उत्साह द्विगुणित करण्याचा प्रयत्न कोकणसादनं केला आहे. चॅनेल, दैनिकाच्या मागे गणरायाचे आशीर्वाद असल्यानं एवढी मोठी टीम कार्यरत आहे. नेहमीच अनोख अन् दर्जेदार अशी कन्सेप्ट कोकणसाद टीमच्या माध्यमातून राबविली जाते. या आरती संग्रहाच्या माध्यमातून सुद्धा हा वेगळेपणा जपला आहे. सामाजिक, धार्मिक अशा विविध क्षेत्रात आम्ही कार्यरत आहे. कोकणातील युवा शक्तीच्या कल्याणाकडे कोकणसादच विशेष लक्ष आहे.
यानंतर सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले, मुख्य संपादक सागर चव्हाण, दोडामार्ग बायोफ्युल्स प्रोड्यूसर कंपनीचे एम.डी. हरिहर मयेकर, श्रीराम बोअरवेल्सचे आशुतोष पाटील, ब्युरो चीफ संदीप देसाई आदींच्या प्रमुख उपस्थितीत दर्जेदार अशा कोकणसादच्या आरती संग्रहाच शानदार प्रकाशन करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत असताना गणेशोत्सवाच्या कोकणवासीयांना शुभेच्छा दिल्या. दोडामार्ग बायोफ्युल्स प्रोड्यूसर कंपनीचे एम.डी. हरिहर मयेकर यांनी शुभेच्छा देत असताना एमसीएलच्या माध्यमातून करत असलेल्या जैव इंधन निर्मीती व स्वयंरोजगाराबद्दल माहीती दिली. या कार्यात कोकणसादच सहकार्य नेहमीच लाभत आलं आहे. इतरांपेक्षा वेगळं काम कोकणसादची टीम करत असून अभ्यासू व लोकोपयोगी अशी माहिती दिली जात आहे.
दरम्यान, प्रमुख अतिथी संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले म्हणाले, कोकणसाद LIVEनं प्रकाशित केलेला आरती संग्रह खूपच सुबक आणि आकर्षक आहे. कोकणसादच्या कोणत्याही कार्यक्रमात माझी उपस्थिती असतेच. युवा शक्तीसाठी कोकणसाद करत असलेलं काम हे कौतुकास्पद आहे. कोकणात भरपूर संधी असून आपल्या भूमित काम करण आवश्यक आहे. देश-परदेशात शिक्षण घेतल्यानंतर त्याचा फायदा हा आपल्या जन्मभूमीला व्हावा यासाठी प्रयत्नशील राहत मातृभूमीच्या विकासाचा उद्देश प्रत्येकान जोपासला पाहिजे. तरच स्थानिक लोक बाहेर जाण टाळतील. सध्या, आपल्याकडील बहुतांश युवक हे रोजगारासाठी बाहेर जात आहेत. या लोकांना मातृभूमीकडे पुन्हा वळवण्यासाठी प्रयत्न होणं आवश्यक असून यासाठी कोकणसाद करत असलेलं काम कौतुकास्पद आहे. मी देखील लोकांची जास्तीत जास्त मदत व्हावी यासाठी बाहेर देशात शिक्षण घेऊन पुन्हा सावंतवाडीत परतलो. इथल्या लोकांना रोजगार उपलब्ध करून देण हा आमचा मुख्य उद्देश आहे. जिल्ह्यात रोजगार आणि आरोग्य या दोन महत्त्वाच्या गोष्टी असून याकडे अधिक लक्ष देणं आवश्यक आहे असं मत व्यक्त करत युवराज लखमराजे भोंसले यांनी कोकणवासीयांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
प्रकाशन सोहळ्याचं आभार प्रदर्शन ब्यूरो चीफ संदीप देसाई यांनी मानले. यावेळी त्यांनी खास गणेशभक्तांसाठी कोकणसाद घेऊन आलेल्या नव्या संकल्पनेची माहिती दिली. दरवर्षी होणाऱ्या गणेश सजावट स्पर्धेप्रमाणे यंदाही स्पर्धा होणार असून यावेळच स्वरुप हे अनोख आहे. फक्त १०० रूपयात आपल्या घरचा गणराया जगभरात पोहचणार असून महाचॅॅनेलची महास्पर्धा...'मोस्ट व्हायरल बाप्पा' अशी अनोखी स्पर्धा कोकणसादच्या माध्यमातून होत आहे. लवकरच याच्या डिटेल्स कोकणसाद LIVE च्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार असून यामध्ये लाखो गणेशभक्तांनी सहभाग घेत आपला बाप्पा जगभर पोहचवावा असं आवाहन केल.