तळकट येथील पैठणीच्या खेळात आरोही शेटकर विजेती

मानसी राऊळ उपविजेती
Edited by:
Published on: October 07, 2025 19:32 PM
views 25  views

बांदा : तळकट येथील माऊली मंदिरात नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पारंपरिक पैठणीच्या खेळात आरोही लक्ष्मण शेटकर हिने प्रथम क्रमांक मिळवत विजेतेपद पटकावले, तर मानसी मणिपाल राऊळ हिने द्वितीय क्रमांक मिळवून उपविजेतीपद मिळवले.

शिक्षक मणिपाल राऊळ आणि अॅटो गॅरेजचे मालक रजत सावंत यांच्या वतीने या स्पर्धेतील विजेत्यांना पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले. गावातील महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत या कार्यक्रमाला रंगत आणली. सहभागी सर्व महिलांना आयोजकांकडून भेटवस्तू देण्यात आल्या.

कार्यक्रमादरम्यान लहान मुलांसाठी व उपस्थित प्रेक्षकांसाठी विविध मनोरंजक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या मुलांना देखील भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाचे रंगतदार निवेदन उपशिक्षक जे. डी. पाटील व स्वाती पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी माऊली देवस्थान कमिटी, तळकट आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.