एड्युस्मार्ट ॲक्टीव्हीटीच्या आरादय गवाणकरची थायलंडमध्ये होणाऱ्या गणित स्पर्धेसाठी निवड

Edited by: उमेश बुचडे
Published on: August 08, 2023 17:15 PM
views 207  views

कणकवली: एड्युस्मार्ट ॲक्टीव्हीटी सेंटर कणकवलीतर्फे आरादय रक्षिता रविंद्र गवाणकर (इयत्ता चौथी) याची थायलंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय गणित आणि मानसीक अंकगणित(ABACUS) स्पर्धेसाठी(IAMA)2023द्वारा राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे.ही स्पर्धा दि.१२/०८/२०२३ रोजी थायलंड येथे होणार आहे.

भारताकडून एकुण 22 मूलांची निवड झाली असून जगभरातून 2000 विविध देशातील मुले या स्पर्धेत भाग घेत आहे . आरादय याने अबॅकस या  अंकगणित विषयाचे प्रशिक्षण एड्यूस्मार्ट ॲक्टीव्हीटी सेंटर, कणकवली च्या संचालिका सौ.सोनाली श्रीकृष्ण पारकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले आहे.

एड्यूस्मार्ट ॲक्टीव्हीटी सेंटर  2017 पासून कणकवली सिव्हील कोर्ट शेजारी, बिजली नगर येथे कार्यरत आहे.उद्या  आरादय थायलंड साठी रवाना होणार आहे. त्याच्या या शैक्षणिक कामगिरीसाठी सर्व  स्तरातून कौतुक होत आहे.